ग्रामपंचायत घोटसई बद्दल

ग्रामपंचायत घोटसई (पो. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) ही कल्याण पंचायत समिती अंतर्गत येणारी एक प्रगत, लोकसहभागातून विकसित झालेली ग्रामपंचायत आहे. घोटसई गाव हे कृषिप्रधान असून शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध शासकीय योजना, स्वच्छता उपक्रम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम व पायाभूत सुविधा विकास कामे प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

ग्रामपंचायत घोटसईची एकूण लोकसंख्या २९०२ असून ५६६ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावाचा साक्षरता दर ८१.६८% असून एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ४००.९ हेक्टर आहे.

🏛️ प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत घोटसई ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत घोटसई
घोटसई, पो. टिटवाळा,
ता. कल्याण, जि. ठाणे

📧 ई-मेल: grampanchayatghotsai@gmail.com

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत घोटसईमध्ये एकूण ९ सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे —

श्री. संतोष किसन धुमाळ,
श्री. सुयोग गुरुनाथ मगर,
सौ. सविता योगेश मगर,
सौ. वनिता राम मगर,
श्री. राजेंद्र वामन मगर,
सौ. जागृती जगदीश गायकवाड,
श्री. मनोज आत्माराम पवार.

ग्रामपंचायत आढावा व सुविधा

ग्रामपंचायत घोटसई हद्दीत खालील सर्व मूलभूत व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत —

ग्रामपंचायत भवन, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन व्यवस्था, इंटरनेट सुविधा, सीसीटीव्ही प्रणाली, डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र), व्यायामशाळा, तलाव / गाव तलाव, माध्यमिक विद्यालय.

योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत घोटसईमध्ये खालील शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत —

जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, महिला बचतगट / उद्योजकता योजना, जन मन योजना, शबरी आवास योजना इत्यादी.

ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹ २२,५०,०००/- असून तो पुढील बाबींवर खर्च केला जातो —

प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, ५% दिव्यांग कल्याण, १०% महिला व बालकल्याण, १५% मागासवर्गीय कल्याण, रस्ते, पशुसंवर्धन, कृषी, गटारे, स्मशानभूमी, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर विकासकामे.

धार्मिक व सांस्कृतिक जीवन

ग्रामपंचायत घोटसईतील प्रमुख धार्मिक स्थळ कान्होबा मंदिर, घोटसई आहे.
गावात “एक गाव – एक होळी”, पालखी सोहळा व जत्रा (छबिना) हे सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

महिला सक्षमीकरण व सामाजिक संघटना

ग्रामपंचायत घोटसई अंतर्गत खालील महिला व सामाजिक संघटना कार्यरत आहेत —

  • श्री सद्गुरु कृपा ग्रामसंघ

  • सखी ग्रामसंघ

  • समर्थकृपा बचत गट

  • नवदुर्गा बचत गट

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचतगटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.

स्वच्छता व पर्यावरण उपक्रम

गावात नियमित स्वच्छता मोहीम राबविली जाते.
तसेच प्लास्टिक-मुक्त ग्रामपंचायत उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे.

नागरिक सेवा

ग्रामपंचायत घोटसईमार्फत खालील सेवा नागरिकांना पुरविल्या जातात —

जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला (निःशुल्क), ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला, नमुना नं. ८ उतारा (मालमत्ता कर आकारणी नोंदवही), जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, समाजकल्याण, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण, दिव्यांग कल्याण योजनांचे अर्ज, मनरेगा मजूर नोंदणी, महसूल विभागाच्या सामाजिक अर्थ सहाय्य योजना, घरकुल अर्ज, नळजोडणी अर्ज, ऑनलाइन तक्रार फॉर्म.

पुरस्कार व सन्मान

ग्रामपंचायत घोटसईला विविध शासकीय व सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे —

  • आमदार आदर्श गाव पुरस्कार

  • तंटामुक्ती गाव पुरस्कार

  • संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा – प्रथम क्रमांक

  • पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार

  • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे यांच्याकडून पुरस्कार

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

ग्रामपंचायत घोटसईचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education

Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

Together, we aim to make every village model of cleanliness, digital governance, and sustainable development

Ghotsai Grampanchayat